संस्कृत साहित्य
जयतू संस्कृतमं | वदतू संस्कृतमं |
संस्कृत
भाषा ही भारताने जगाला दिलेली एक अभूतपूर्व देणगी आहे. संस्कृत ही अत्यंत अचूक, संपूर्ण, वैज्ञानिक, मधुर व श्रीमंत
भाषा आहे. जगातील कुठल्याही भाषेपेक्ष जास्त अक्षरे व शब्द संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत
साहित्यात काव्य, नाटक, तत्वज्ञान, तांत्रिक, वैज्ञानिक व धार्मिक ग्रंथांचा सामावेश होतो.
आदि काळापासून संस्कृतचे ज्ञान मौखिक पद्धतिने पिढ्यान पिढ्या प्रसृत करण्यात आलेले
आहे. संस्कृतची ज्ञानधन ब्राम्ही व देवनागरी लिपीमध्ये नोंदविण्यात आलेली आहे.
३१ जुलै २०२० च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २४,८२१ लोकांनी त्यांची मातृभाषा संस्कृत असल्याची नोंद
केलेली आहे. तसेच भारतात संस्कृत बोलणार्यांची संख्या एकूण २३,६०,८२१ इतकी आहे. भारतीय
राज्य घटनेच्या आठव्या सूचीनुसार संस्कृत ही इतर २२ भाषांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली
आहे. उत्तर भारतीय व कर्नाटक संगीतामध्ये संस्कृतचा भरपूर उपयोग केल्या जातो, परंतु आता ह्या लेखात आपण त्या विषयी बोलणार नाही. त्याबाबत पुढील लेखात बोलूया.
जगप्रसिद्ध
वेद, उपनिषदे व भगवतगीता हे प्रमुख ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे
चार वेद भारतीय संस्कृत व संस्कृतिक इतिहासाचे प्रमुख संदर्भ ग्रंथ आहेत. प्रत्येक
वेदात, संहिता, ब्राह्मनम, आरण्यक व उपनिषत असे चारभाग आहेत. जगातील सर्वात जुने व्याकरण हे महर्षि पाणिणी
यांचे “अष्टाध्यायी” आहे व अजूनही ते उपयोगात आहे. उत्तर वैदिक काळात वेदांग म्हणून
व्याक्रणाचा समावेश झालेला आहे. अष्टाध्यायीत एकूण ३९५९ सूत्रे आहेत. जगातील बर्याच
भाषांमध्ये संस्कृत मधून कित्येक शब्द गेलेले आहेत. एक उदाहरण घेऊ. जर्मनीच्या प्रसिद्ध
विमान कंपनीचे, “लुफ्तानसा”. या शब्दाचा संधिविग्रह केला तर
तो असा होईल, “लुफ्त” आणि “हंस”;
म्हणजे हरवलेला हंस. भारतात, हंस हा अचैतन्याचा द्योतक
मानल्या जातो. जगातील कुठल्याही भाषेपेक्षा जास्त म्हणजे १०२ अरब, ८७ कोटी ५० लाख शब्द वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये, पुरस्तकामध्ये व बोलण्यामध्ये उपयोगात आणल्या जातात. इतकेच नवे शब्द पुढच्या
१००-१५० वर्षात तयार होऊ शकतात. जसे ५० वर्षापूर्वी अस्तित्वात नसलेले शब्द, स्मृतिकोष (Pen drive),
विद्युतकोष (Dry Battery Cell), जंगमदूरध्वनी (Mobile), पुन:पुरणी (Refill), संगणक
(Computer), प्रतिमायंत्र (Camera), चित्रमुद्रिका (Video Camera), उपग्रहदूरध्वनी (Satellite
Phone), चचार (Car), उर्जाकोष
(Power bank).
आता
आपण संस्कृतमध्ये काय काय साहित्य उपलब्ध आहे ते पाहूया. रामायणाशिवाय, आध्यात्मरामायण, आनंदरामायण, अद्भुत्तरामायण, वसिष्ठरामायण. मत्स्यपुराण, मार्कंडेयपुराण, भागवतपुराण, भविष्यपुराण,
ब्रह्मांडपुराण, ब्रह्मपुराण, ब्रम्हवैवर्तपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण,
वामनपुराण, वराहपुराण, अग्निपुराण, नारदपुराण, पद्मपुराण,
लिङ्गपुराण, गरुडपुराण, कूर्मपुराण, स्कंदपुराण अशी आहेत. याशिवाय अजून काही उपपुराणे आहेत. ती अशी, विष्णुधर्मपुराण, विष्णुधर्मोंतरपुराण, नारसिंह, ब्रुहन्नारदीय,
क्रिययोगसार, देवीपुराण, कालिकापुराण, देवीभागवत, महाभागवत, शिवपुराण, शिवरहस्य, एकाम्रपुराण,
साम्बपुराण, गणेशपुराण, मुद्ग्लपुराण, भविष्योंत्तरम, बृहद्धर्मपुराण, भार्गवपुराण.
पाच
महाकाव्ये तर साहित्यातील खजिनाच म्हटला पाहिजे,
ज्यात, कलिदासाचे रघुवंश, कुमारसंभव, भारावीचे किरातार्जुनीय, माघाचे शिशुपालवध, तर श्रीहर्षाचे नैषधीयचरितमं याचा समावेश होतो.
यावरूनच
श्लोक निर्माण झाला असावा.
“उपमा कालिदासस्य, भारवे अर्थगौरम |
दन्डिन: पदलालित्यम, माघे सन्ति त्रयो गुणा:
||”
महाकवि
कालिदासने याशिवाय अभिज्ञानशाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम ही नाटके तर मेघदूतव ऋतुसंहार ही खांडकाव्येही लिहिती
आहेत. संस्कृत साहित्यात प्रसिद्ध असणार्यांमध्ये शिलाभट्टारिका, तिरूमलाम्बा, विज्जीका, विजया, गंङादेवी, रामभद्राम्बा,
देवकुमारिका व क्षमराव ह्यांचा समावेश होतो.
कथा
स्वरुपात, विष्णुशर्माचे पंचतंत्र, नारायनाचे
हितोपदेश, सोमदेवाचे कथासरित्सागर व गुणाढ्याचे बृहत्क्था
यांचा समावेश होतो. फक्त ३०० श्लोक लिहिणारा राजा भर्तृहारी तर अद्वितीयच म्हणावा
लागेल. त्यात, १०० श्लोक शृंगारशतक,
१०० श्लोक वैराग्य शतक तर १०० श्लोक नीतीशतकाचे आहेत, तरीही
हा अभूतपूर्व खजिना म्हणावा लागेल. सुभाषितरत्नभंडारामध्ये १०,००० सुभाषिते आढळतात. एक वेगळ्या प्रकारचे साहित्य म्हणजे अमरकोष, मेदिनीकोष, हलायुधकोष व त्रिकांडशेषकोष.
वेदांचाच
पुढचा भाग म्हणजे उपनिषदे, ज्यात ईशावास्योपनिषत, केणोपनिषत, कठोपनिषत, प्रष्ंनोपनिषत, मुंडकोपनिषत, मांडूक्योपनिषत,
ताईतरीयोपनिषत, ऐतरेयोपनिषत, छानदोग्योपनिषत, बृहदारण्यकोपनिषत होत. प्रस्थानत्रयि मध्ये उपनिषद,
भगवतगीता व ब्रह्मसूत्रे यांचा समावेश होतो. स्मृतिग्रंथामध्ये मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृति, पराशरस्मृति, देवलस्मृति व् नारदस्मृति हे मौल्यवान ग्रंथ आहेत.
आस्तिक
दर्शनामध्ये, कपिल मुनींचे सांख्यदर्शनम, महर्षि पतंजलिचे योगदर्शन, गौतमाचे न्यायदर्शन, कनादांचे वईषेशिकदर्शनम, जैमिनीचे पूर्वमिमांसा व
महर्षि व्यासांचे उत्तर मिमांसा हे येतात. त्याचप्रमाणे,
नास्तिक दर्शनात, चार्वाकदर्शन,
जैनदर्शन, बौद्धदर्शन यांचा समावेश होतो.
साहित्य, तत्वज्ञान, धार्मिक याशिवाय संस्कृत भाषेमध्ये इतर ज्ञानविषयक
लिखाण केलेले आहे. आरोग्याच्या बाबतीत चरक, सुश्रुत, जीवक व दिवोदास यांचे पण योगदान खूप मोलाचे व महत्वाचे मानले जाते. आपण याबाबत
पुढे येका लेखात चर्चा करणार आहोतच. पायथ्यागोरसने (Pythagoras) त्याचा सिद्धान्त मांडण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ७००-६०० या काळात हाच
सिद्धान्त शुल्बसूत्रात मांडलेला आहे. तसेच प्रसिद्ध पायची किंमत आर्यभट्टने ख्रिस्तपूर्व
५०० मध्येच मांडलेली आहे.
सौरशक्ती, प्रकाश, उष्णता, वर्ण याविषयी
भरद्व्ज यांनी अंशुबोधिनी व नारायनसुक्तम हे ग्रंथ लिहिले आहेत. रसायनशास्त्रावर (Chemistry) भरद्वाजानी विश्ववाद्म ह्या ग्रंथाचे लेखन केले. पाकक्रियेबाबत (Catering
& Recipe) ऋषि सुकेश यांनी पाकविज्ञान ह्या ग्रंथाचे लेखन कळे. महर्षि
वाल्मिकीनी गणितावरील ६४ सूत्रे अक्षरलक्षणगणितशास्त्रं याचे लेखन केले आहे. आश्चर्य
म्हणजे छायाचित्रीकरणावर (Photography) देखील भीममहर्षिनी चित्रकर्म
हा ग्रंथ निर्माण केला. प्राणीवैद्यक शास्त्रावर (Veterinary Science) शालिहोत्रमहर्षि यांनी अश्वचिकीत्साशास्त्रं हा विज्ञाना संबंधी ग्रंथाची रचना
केली. संगीतावरील (Musicology) सुप्रसिद्ध संगीत रत्ंनाकर हा
महर्षि शारंगधरानी लिहिलेला आहे. राज्यप्रशासन व व्यवस्थापनशास्त्रावर (State
Governance & Management) सुप्रसिद्ध आर्य चाणक्यांनी तर तितकेच
महत्वाचे काम केलेले आहे. संगीत, आरोग्य व व्यवस्थापनशास्त्र
या विशयावर स्वतंत्र लेख लिहिणार आहोतच.
आधुनिक
काळात काही संस्कृत पंडितांनी सुद्धा लेखण केलेले आहे. श्री. जग्गूवकुलभूषण यांनी अद्भुतदूतम, शृंगारलीलामृतम, श्री. श्रीधर भाष्कर वर्णेकर यांनी
शिवराज्योदय, जवाहर तरंगिणी याचे लेखण केले आहे. याशिवायही इतर
लेखकांनी संस्कृतमध्ये अलीकडच्या काळात लिखाण केलेले आहे.
आज
भारतात एकूण १६ संस्कृत विद्यापीठे कार्यरत आहेत. कालच भारत सरकारने जाहीर केलेल्या
नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्कृतला भरपूर महत्वं प्रदान करण्यात आलेले आहे. येणार्या
काळात जसा, योगाचा संयुक्त राष्ट्र संघाने स्विकार
करून आंतरराष्ट्रीय योगदिन सुरू केला तद्वतच आपण सगळे आशा करूया की लवकरच संस्कृत भाषेचा
अव्वल व उत्तम दर्ज्याची वैज्ञानिक भाषा म्हणून स्विकार केल्या जाईल.
|| पुनर्मिलाम: ||
पठामि संस्कृतं नित्यम, वदामि संस्कृतं सदा |
ध्यायामि संस्कृतं सम्यक, वन्दे संस्कृत मातरम ||१||
मुकुंद भालेराव
प्रमुख:
प्रचार विभाग, देवगिरी प्रांत, संस्कृत भारती
|| संपर्क ||
| Twitter: @mukundayan | Instagram: mukundayan |
| Telegram: mukundayan | Blog: Mukund Bhalerao |
|Skype: Mukundayan | E-Mail: mukundayan@yahoo.co.in|