“भारत देशाकरिता येकच समान सांस्कृतिक भाषा म्हणजे संस्कृत भाषा.” - भारतरत्न डों बाबासाहेब आंबेडकर
श्रावण द्वादशी (दिनांक
३१ जुलै २०२०) शुक्रवार ते तृतीया (६ ऑगस्ट २०२०) गुरुवार या सप्ताहात पूर्ण देशात
व देशाबाहेर संस्कृत सप्ताह साजरा होणार आहे. भारत सरकारने नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण
जाहीर केले, त्या प्रमाणे तीन भाषेच्या सूत्रात
संस्कृतचा समावेश करण्यात आला आहे. ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीय नागरिकाला संस्कृतविषयी
माहिती करून घेणे हितावह ठरेल ह्या उद्देशाने काही विचार मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न
आहे.
संस्कृत ही भारताची येक
अधिकृत भाषा आहे. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी समजले जाते. संस्कृत भाषा ही
तिच्या अचूकते करिता व सौन्दर्याकरिता ओळखल्या जाते. हिंदू शिवाय, जैन व बौद्ध धर्मातील साहित्य संस्कृत भाषेत आहे. आज सगळे जग संस्कृतकडे आकर्षित
होत आहे. भारतातील सर्व हिंदू, धार्मिक कार्यक्रमात संस्कृत भाषेचाच
वापर करतात व ती अत्यंत पवित्र समजल्या जाते. संस्कृत मंत्राचे ऊच्चारण हे विशिष्ट
पद्धतीने केल्यामुळे तयार होणार्या ध्वनिचा, व्यक्तीच्या मनावर
व शरीरावर चांगला परिणाम होत असतो. असे समजल्या जाते कि, संस्कृत
भाषा प्रत्यक्ष ब्रम्हदेवाने निर्माण केली असून ती ब्रह्मदेवाने ऋषिना सांगितली. त्यामुळे
संस्कृतला “देववाणी” म्हणतात.
आठराव्या शतकात संस्कृत, लॅटिन व ग्रीक भाषेमध्ये काही समानता आढळून आल्यानंतर संस्कृत व यूरोपियन
भाषांचा तौलनिक अभ्यास भारतात व युरोपीय देशांमध्ये सुरू झाला. संस्कृत भाषेतील सर्वात
जुने लिखाण हे वेद कालीन असून त्याचा कालावधी इसवीसनापूर्वी १५०० ते २०० असा आहे. त्यावेळी
ज्ञानदानाची पद्धत ही मौखिक होती. मानवी इतिहासात संस्कृत साहित्य हे सर्वात जुने साहित्य
आहे.
हिदू धर्माला पायाभूत
असणारे वेद, उपनिषदे, पुराणे, वेदांगे, मंत्र (Vedas, Upanishdas,
Puranas, Vedange and Mantras) या सर्वांची निर्मिती याच काळात झाली.
त्यात सर्वात जुने म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद (Rugved, Samved, Yajurved & Atharvaved). या महान ग्रंथावर आधारित ग्रंथ, पुढे इसवीसनापूर्वी
५०० ते १००० या काळात निर्माण झाले. या नंतरच्या काळात महर्षि पाणिणीनी (Maharshi
Panini) संस्कृत व्याकरणाची रचना केली.
भारताला
अति सम्रुध्द साहित्यिक वारसा प्राप्त झालेला आहे, ज्यात दोन महाकाव्ये
(Epics) म्हणजे रामायण व महाभारत हे होत. याशिवाय, चार वेद (Vedas), दहा उपनिषदे (Upnishadas), सहा आस्तिक दर्शने (Astik Darshne), चार नास्तिक दर्शने
(Nastik Darshane), अठरा पुराणे (Puranas), अठरा उपपुराणे (Uppuranas), नाट्ट्यशास्त्र (Dramatics), विमानशास्त्र (Aeronautics), रसायनशास्त्र(Chemistry), शस्त्रशास्त्र (Weapon Technology), नौकाशास्त्र (Marine
Engineering), युध्दशास्त्र (Science of Wars), काव्यशास्त्र (Art of Poetry), संगीतशास्त्र (Musicology),
आयुर्वेद व शल्यचिकित्सा (Health Science & Surgery), औषधीशास्त्र (Pharmacology), प्रशासनशास्त्र(Management
Science), न्यायशास्त्र (Judicial Science) असे
अनेक ग्रंथ, महान ऋषींनी अखंड परिश्रमाने तयार करून ठेवलेले आहेत.
दुर्दैव असे की, स्वातंत्र्योत्तर काळात तयार केलेल्या शिक्षण
धोरणांत, महान भारतीय संस्कृति व प्राचीन गौरवशाली इतिहास याचा
विचारच केलेला नाही.
या
अनुषंगाने संस्कृत सप्ताहात दररोज एका विषयाची तोंडओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्ंन
करून त्यात संगीत, रसायनशास्त्र, न्यायशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, आरोग्यशास्त्र, साहित्य, गणितशास्त्र
यातील काही विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.
पठामि संस्कृतं नित्यम, वदामि संस्कृतं सदा |
ध्यायामि संस्कृतं सम्यक, वन्दे संस्कृत मातरम ||१||
मुकुंद भालेराव
प्रमुख: प्रचार विभाग, देवगिरी प्रांत, संस्कृत भारती
********************************************
|| संपर्क ||
| Twitter: @mukundayan Instagram: mukundayan
| Telegram: mukundayan Blog: Mukund Bhalerao |
| Skype: Mukundayan | E-Mail: mukundayan@yahoo.co.in
==================================================
No comments:
Post a Comment
Welcome. Thanks for your comments