|| सामवेद आणि संगीत ||
वेदनाम सामवेदोस्मि देवानामस्मि वासव: |
भगवतगीता: अध्याय १०
भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विभूति योगात
स्पष्टपणे संगितले आहे की, वेदांमध्ये मी सामवेदात आहे. यावरून हे लक्षात
येते की सर्व वेदांमध्ये सामवेद किती महत्वाचा आहे. या लेखात पुढे जाण्यापूर्वी आपण
प्रथम सामवेदाविषयी काही महत्वाच्या ठळक गोष्टी पाहू.
०१] सामवेद हा भारत-यूरोपामधील सर्वात जुना ग्रंथ
असून, तो जवळपास इसवीसना
पूर्वी १७०० वर्षे लिहिला आहे.
०२] सामवेद हा सर्व वेदांमध्ये
सर्वात लहान वेद आहे. त्यात एकूण १८७५ सूत्रे आहेत; ज्या पैकी १७७१ सूत्रे ऋग्वेदातून
घेतली आहेत व फक्त ९९ सूत्रे ही मूळ सामवेदातील आहेत.
०३] सामवेद ही जगातील सर्वात जुनी सांगितीक रचना आहे. तसेच मानवी साहित्यातील
संगीताविषयी सर्वात जुने साहित्य म्हणता येईल. त्यामध्ये, मंत्र, छंद, भाषशास्त्र असे विविध प्रकार आहेत. सामवेदाची रचना खास करून यज्ञ प्रसंगाच्या वेळी
व विशेष प्रसंगाच्या वेळी गाण्याकरिता केलेली आहे.
०४] सामवेद संहितेने बरेचशे श्लोक ऋग्वेद संहितेतून
घेतले आहेत, खास करून ऋग्वेदाच्या आठव्या व नवव्या मंडलातून.
०५] अतिप्राचीन काळातील साहित्यातून सुव्यवस्थित संगीतशास्त्र
हे सामवेदाच्या शक्तिशाली प्रेरणास्त्रोतातून झालेले आहे.
सामवेदाचा अर्थ पाहू या आधी. समान म्हणजे गाणे व वेद म्हणजे ज्ञान. सुश्राव्य रचना व मंत्र म्हणजे सामवेद. सामवेदाची रचना ही जवळपास अथर्ववेद व यजुर्वेदांच्या बरोबरच झालेली आहे. सामवेदामध्ये छान्दोग्य उपनिषद आणि केन उपनिषद समाविष्ट आहेत ज्याचा अभ्यास खूप लोक करतात. ही दोन उपनिषदे ही प्राथमिक व मूलगामी अशी उपनिषदे आहेत. यांचा प्रभाव तत्वज्ञान व वेदान्त ह्यावर जास्त झालेला आढळून येतो.
सामवेद हा संगीता प्रमाणेच नृत्य कलेचाही प्रवर्तक आहे. सामवेद गाण्याचे जवळपास १०-१२ प्रकार आहेत. जैमिनिया ही जिवंत असणारी सर्वात जुनी सामवेद गायन पद्धती आहे. हे मंत्रांचे भांडार आहे. याला गाण्याचा ऋग्वेद असेही म्हणता येईल. सामवेदाची लिखाणपद्धती वेगळी आहे. त्यात अक्षरांच्या वर किंवा मध्ये, अक्षरात किंवा आकड्यात लिहिण्याची पद्धत आहे.
सामवेदाचे दोन मुख्य भाग आहेत. पहील्या भागात चार प्रकारच्या संगीत रचना आहेत, तर दुसर्या भागात तीन रचना आहेत. गानसंग्रहात दोन भाग आहेत, ग्रामगेय व अरण्यगेय; तर अर्चिकेत पूर्वाचिका व उत्तरारचिका असे दोन भाग आहेत. पूर्वाचिकेत एकूण ५८५ एका कडव्याचे गद्य लिखाण आहेत आणि ते दैवता प्रमाणे रचलेले आहेत. उत्तरारचिकेत ते कर्मविधी प्रमाणे आहेत. ग्रामगेय काव्यरचना ह्या गावातील लोकांना गाण्याकरिता आहेत, तर अरण्यगेयातील रचना ह्या साधूसंत, योगी व सन्यासी यांना अरण्यात गाण्याकरिता आहे.
ऋग्वेदाप्रमाणेच, सामवेदाची सुरुवातदेखिल
अग्नि आणि इंद्र यांच्याविषयीच्या मंत्रानीच होते; परंतु त्यात
अस्पष्ट तत्वज्ञान व तार्किक संकल्पनाकडे उतरत्या क्रमाणे वळते. सामवेद हा बाकीच्या
वेदांसारख वाचण्याकरता नाही, तर गाण्याकरिता व ऐकण्याकरीता
आहे. तो श्रवणीय आहे कारण तो त्याकरिताच रचलेला आहे. संगीत, ध्वनि व गहन अर्थ यांचा सुंदर संगम म्हणजे सामवेद. ऋग्वेदातील सूत्रे गेय बनवून गाण्याकरिता व ऐकण्याकरिता रचलेली आहेत. उदा.
“अग्न आ याहि वीतये (Agna a yahi vitye) rugved
6.16.10
Samveda transformation
(Jaiminiya manuscript)
“O gna I / a ya hi va / ta ya I ta ya I /”
It means “O Agni come to
the feast.”
“हे अग्निदेवा, आपण या सभारंभाकरिता यावे असे मी आपणास आवाहन करतो.”
छंदोग्य उपनिषद हे सामवेदाचाच
भाग असून त्याचा अभ्यास तत्व्ज्ञानाचा अभ्यास करण्या करिता जास्त केल्या जातो. साक्षात
वेदमूर्ति आदिशंकराच्यार्यानी छंदोग्य उपनिषदाचा उल्लेख वेदान्तसूत्र भाषयात एकूण 810
वेळा केलेला आहे. छानदोग्य उपनिषद हे सामवेदातील तत्वज्ञानाविषयी आहे.
भारतीय नृत्य व अभिजात
संगीत यांचे मूळ सामवेदाच्या गेयता व सांगितीक स्वरुपात आहे. सामवेदामध्ये मंत्र
व गाण्याशिवाय, संगीत वाद्द्यांचा उल्लेखही आहे. सामवेदातच “गांधर्ववेद” समाविष्ट केलेला
आहे. सामवेदातील मंत्रांची रचना व स्वरूप यांच्याच प्रेरणेतून भारतीय अभिजात
संगीत व प्रदर्शनीय कला याचे मूळ असल्याचे अनेक संगीतकारांचे मत आहे.
सामवेदाचा जन्म हा यज्ञकर्म करण्याच्या
वेळी म्हणावयाच्या गतीबद्ध व् सूमधूर मंत्र उच्चारण्याकरिता झालेला आहे. यज्ञामध्ये
देवांची प्रार्थना करून त्यांना आवाहन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. तसेच
यज्ञामध्ये हवीय अर्पण करताना मंत्र म्हणण्यासाठी एक लयबद्ध व सुश्राव्य रचना हाही
सामवेदाचा उद्देश होता व आहे. जसा एक श्लोक आपण ऐकलेला आहे,
“ब्रम्हार्पणमं ब्रम्हहवीर, ब्रम्हाग्नो
ब्रम्हणाहुतमं |
ब्रम्हैव्तेन गंतव्यमं, ब्रम्हकर्म समाधीना:
||”
त्याकाळी यज्ञाच्या वेळी जे ऋषि
मंत्र म्हणत असत, त्यांनी त्यांच्या सोयीसाठी, ऋग्वेदातील निवडक मंत्र, जे की गाण्याकरिता सुयोग्य होते त्याचे संकलन केले. अशा संकलित केलेल्या गेयमंत्राच्या
संग्रहास पुढे जाऊन सामवेद संहिता असे नाव पडले असावे. सामवेदातील बहुतेक मंत्र
हे गायत्री छंदामधील आहेत.
“एसा उ समा | वग वई समईयसा
सा कामास सेती तत समाह समत्वाम |
यद व एवा समाह प्लुसिना समो मसाकेना
समो |
नगेना समा इभिस त्रिभीर लोकइथ
समो |
नेना सर्वेना तस्म्द वी समा | असणूते समानह
सईयूयाम सलोकतामं |
या एवाम येतत साम वेद |” बृहदारण्य
उपनिषदात (१-३-२२).
सामवेद खरोखरच ऋग्वेदातील
निवडक मंत्रांचे सुश्राव्य स्वरुपात गायन करण्याची आखीव व रेखीव महान केलाकृती आहे.
ऋग्वेदातील मंत्राना गेय स्वरूप
देण्याकरिता त्या मुळ मंत्राना थोडेसे बदलले, लांबविले, त्यातील
काही उच्चार बदलले, आवाजातील चढउतार तयार केले. गाताना शब्दांना
तरंगण्यासारखा आभास निर्माण केला. स्वरांचा प्रक्षेप केला किंवा त्यात काही अर्थहीन
स्वर उपयोगात आणले, जसे की, “स्तोभ” (आनंदातून
निर्माण निघणारा आवाज), जसा की, होई, होय, होवा, हाई, हाऊ, ओइई, आई, हा, हो, ऊहा, तायो वगैरे. सामवेदात गाण्याकरिता प्रत्येक मंत्रचा उच्चार हा लांबवलेला (Elongated) आढळतो.
सामवेदातील मंत्र म्हणणार्या
ऋषिना ऊदगत्रुस (उदगीता म्हणजे गाणे म्हणणे मोठयाने). छान्दोग्य उपनिषदात(१.३.६), या सूत्रात, उदगीता या शब्दाचा संधीविग्रह, ऊद म्हणजे श्वास (प्राण) खूप उंच आवाजात घेणे, गी म्हणजे
(वाक) आणि थ म्हणजे ज्यात हे सर्व स्थित आहे.
त्याकाळात जे ऋषि यज्ञ करताना
मंत्र म्हणत असत, त्यांना “उद्ग्थृस” असे म्हणत.
या शब्दाचे मूळ उदगीता म्हणजे मोठ्या आवाजात गाणे म्हणणे असा आहे.
“अथ खलू उदगितक्ष्ररनाय उपासिता
उद-गी-था इति | प्राणा इव्होत |
प्रनेणा हय उत्तीसस्थिती | वगगिह | वाको हा गिरा इति अकक्षते |
अन्ंनाम थाम | अन्ने हिदम सर्वाम
स्थितम |” च्छांदोग्य उपनिषद (१.३.६)
“सा” म्हणजे ऋग्वेद मंत्र व “म”
म्हणजे वेगवेगळ्या रचना असे म्हटले आहे. सामवेद संहितेची रचना ही उद्गाथृस यांच्या’ सोईकरिता
झाली होती. अशा उद्गातृसच्या समूहात तीन ऋषि असत. त्यांना प्रस्थोथृ, उदग्थृ व प्रथिहरथा असे म्हणत. हा सामगान करणार समूह सामगान पाच पातळ्यामध्ये
करीत असत.
प्रस्थाव: मंत्राच्या सुरुवातीचा
भाग प्रसथोथृ गात असत आणि ते खोल आवाजातील “हुंकार” करून गात असत.
उदगीता: ह्या चरणात, उद्गाथृ ऋग्वेदातील
मंत्र पठण करीत असत व ते त्यांच्या गायनाची सुरुवात “ओम” ह्याचा विस्तारपूर्वक
ध्वनि वापरुन करत असत.
प्रतीहारा: श्लोकांचा मध्य भाग हा
मोठ्या आवाजात प्रथिहार्था करीत. ह्याचा उद्देश ज्या देवतेची आराधना करावयाची आहे त्याना
प्रसन्न वाटावे असा होता.
उपद्रव: मुख्य ऊदगरथृ पुन्हा
गान करायचे.
निधान: श्लोकाचा अंतिम भाग वरील
सर्व, एकत्र मिळून करीत असत व त्याची सुरुवात विस्तारलेल्या (Elongated) “ओssssssssssssम” ने करावयाची असते.
वरील पद्धतीने मंत्राचा तीन वेळा
उच्चार करण्याला “स्तोम” असे म्हणतात. काही ठिकाणी याचा उल्लेख पाच वेळा मंत्रोच्चार
करावा असाही आहे, तर काही ठिकाणी सात वेळा व त्यास भक्ति म्हटल्याचे उल्लेख आढळतात.
उच्चारण्याचे शास्त्र:
तैतरिय
उपनिशदामध्ये, ध्वनिशास्त्र व मंत्रोचार याचा उपयोग कसा करावयाचा याविषयी विस्तृत
विवेचन केलेले आहे. त्यात उच्चार करण्याचे सहा महत्वाचे पैलू विशद केलेले आहेत; ज्यात,
वर्ण (Syllable), स्वर (Accent), मात्रा (Duration), बलम (Stress) आणि सम (Even Tone) या विषयी लिहिलेले आहे. यातील पहीले
चार शुद्ध उच्चार करण्याविषयी आहेत तर, शेवटचे दोन संपूर्ण वाक्य
किंवा पूर्ण स्तोत्र म्हणण्याविषयी आहे.
“ओम सिक्षाम व्याख्यास्यामह | वर्णह स्वरराह
|
मात्रा बलम | समा संतानह | इतयुक्ताह शिक्षाध्यायह ||” तैतरिय उपनिषद. (१.२)
वर्ण म्हणजे प्रत्येक स्वतंत्र
शब्दाचा (ज्यात स्वर व व्यंजने आहेत) शुद्ध उच्चार. स्वर म्हणजे शब्दाचा उच्चार
कसा (उद्द्त, अनुद्द्त किंवा, स्वरीत) करावयाचा. मात्रा म्हणजे एक
शब्द उच्चार करण्याकरिता किती वेळ घ्यावयाचा. चार प्रकार आहेत त्याचे. हर्स्व, एकदम छोटा कालावधी छोट्या शब्दांकरिता; दिर्घ, म्हणजे लाम्ब कालावधी लांब व्यंजना करिता, प्लुटम, ज्याचा कालावधी अधिक मोठा आहे; आणि चौथा, व्यंजनाकरिता अर्धी मात्रा ज्या बरोबर एकही स्वर नाही.
समस्वरा: सुरूवातीला, सामगानाकरिता
फक्त तीन मधुरालाप, उद्द्त, अनुद्द्त आणि
स्वरीत. त्यावेळी मंत्र म्हणणार्याना साथसंगत करण्याकरिता फक्त तीनतारी वाद्य (विणेसारखे)
होते. ती सामगाणातील गाणी बहुधा, ग ग रे रे सा सा असे असावेत.
तशा प्रकारची गायनसुक्ते गाण्याकरिता सुयोग्य असावेत. त्या तीन मधुरालापतील फरक हा
की, ते तालव्य, उचईच्य किंवा निचईच्या यावरून
करतात. सामगानातील अक्षरे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये उद्द्त लिहिण्याकरिता अक्षरावर
१, अनुद्त्त करिता अक्षरावर २ व स्वरीत करिता अक्षरावर ३
लिहितात. उदा:
२ ३ १ २ ३१२ ३ २ ३१ २
अग्न आ याहि वीतये
ग्रुनाणो हव्य दातये
Udatt: (1) आ, त, व्य,
Svarita: (2) अ, या, ये, नो, दा
Anudatta: (3) ग्न, वी, णा, ह
Prachaya: हि, ग्रु, त, ये
नारदीय शिक्षेमध्ये समास्वरातील
मधुरालाप वेणुमध्ये म, ग, रे, सा, ध, नी आणि प असे आहेत.
समस्वर |
वेणुस्वर |
||
१ |
प्रथमा |
मध्यमा |
म |
२ |
द्वितीया |
गंधर्वा |
ग |
३ |
तृतीया |
ऋषभ |
रे |
४ |
चतुर्थ |
षड्ज |
सा |
५ |
पंचम |
निषाद |
नि |
६ |
शष्ठ |
धैवत |
ध |
७ |
सप्तम |
पंचम |
प |
नारदीय शिक्षेमध्ये (१.५.३; १.५.४) प्रत्येक
स्वर हे विविध पक्षांनी किंवा प्राण्यांनी काढलेल्या आवाजावरून ठरविले आहे प्रतिपादित
केले आहे; जसे, बैलावरून ऋषभ, क्रौंच पक्ष्याच्या आवाजावरून मध्यम, हत्तीच्या चित्कारावरून
निषाद, कोकिळेच्या सुमधुर आवाजवरुन पंचम अशा प्रकारे ठरले आहेत.
सामगानातील नाव |
चिन्ह |
सामवेदस्वर |
पक्षी / प्राणी / ध्वनि |
मध्यमा |
म |
स्वरिता |
सारस |
गांधर्व |
ग |
उद्त्त |
बकरी |
ऋषभ |
रे |
अनुद्त्त |
बैल |
षड्ज |
सा |
स्वरित |
मोर |
निषाद |
नि |
ऊदत्त |
हत्ती |
धैवत |
ध |
अनुद्त्त |
घोडा |
पंचम |
प |
स्वरीत |
कोकीळ |
त्या काळात ध्वनिग्राहक (Microphone) व
ध्वनिवर्धक (Loudspeaker) नसल्यामुळे, सामगान
हे मोकळ्या, उघड्या, मोठ्या, प्रशस्त जागेत, परंतु वर प्रागभार (Canopy) असलेल्या ठिकाणी गात; जेणेकरून सर्वांना स्पष्टपणे ऐकू
येईल व त्या परिस्थिथितीत जर गाण्यामध्ये “म ग रे सा ध” हे सुर असतील तर फक्त येखाद्या
छोट्या खोलीत ते ऐकू येईल; परंतु जर स्वर “सा नि ध प ग” असे तारसप्तकापासून
सुरू होत असतील तर सर्वांना सहजपणे ऐकू येईल. ह्या दृष्टीकोणातून “सा नि ध प ग” हे
स्वर, “म ग रे सा ध” यापेक्षा जास्ती सुयोग्य आहेत. सामवेदाला
पंचम वेद असेही म्हणतात.
“वीणावादनत्तवजानह श्रुतिजातीविसरदाह
|
तालज्ञानस कप्रयसेना मोक्षमार्गम
नियच्छती ||” (याज्ञवल्क्यस्मृतिसी- ३.११५ )
मनाला व अंत:करणाला अतिशय
आनंदीत करणार्या सर्व कलांमध्ये सर्वोर्कृष्ट संगीतच असे आहे, ज्यामध्ये
भावनांच्या सर्व छटा प्रसृत करण्याची क्षमता आहे. या कलेचा यथायोग्य अभ्यास
केला तर त्यातून मुक्तता व मोक्ष प्राप्ती होऊ शकते. काव्यवाचन व नृत्य हे काव्यगायना
बरोबर केले तर ते मंत्रोचाराईतकेच श्रेष्ठ आहे.
पाठयम नाट्यम तथा गेयम सित्रावा
आदित्रमेवा का |
वेदा मंत्रार्थ वाकनेही सामाम
हयतद भविष्यती ||
२६ ||
देवाचे देव इंद्र
यांच्याकडून मी असे ऐकले आणि हो भगवान शंकराकडूनही ऐकले की संगीत गेय किंवा वाद्यावर
वाजविलेले, हे अतिशय खूप शुद्ध व अतिश्रेष्ठ आहे, विशिष्ट काळी
पवित्र नदीत स्नान किंवा एखादा मंत्र हजार वेळा म्हटल्यापेक्षाही जास्ती मौल्यवान आहे.
हितावह आहे.
“श्रूतम मया देवदेवात तत्तावताह
शंकेराधितम |
स्नान जप्य सहा श्रेभ्या पवित्रम
गिता वादीतम || २७ ||
ज्या ज्या ठिकाणी शुभ गाण्याचे
मंगल ध्वनि आणि नृत्याचे संगीत वारंवार ध्वनित होते, त्या ठिकाणी कधीही अशुभ घटना घडत
नाही.
“यस्मिन नाट्टोद्य नत्त्यास्या गीतपाठ्या ध्वनीह शुभ |
भविस्यत्या शुभम देसे नैव तस्मिन
कदाचन || २८ ||
कर्नाटक |
अक्षरे |
हिंदुस्थानी पद्धत |
पाश्चिमात्य |
षड्ज |
षड्ज |
षड्ज |
C |
शुद्ध रे |
रे१ |
कोमलऋषभ |
D Flat Db |
चतुश्रुती |
रे२ |
तीव्र ऋषभ |
D |
सदारना ग |
ग१ |
कोमल ग |
E Flat Eb |
अंतरा ग |
ग२ |
तीव्र ग |
E |
शुद्ध म |
म१ |
कोमल म |
F |
प्रती म |
म२ |
तीव्र म |
F Sharp F+ |
पंचम |
प |
पंचम |
G |
शुद्ध ड |
ड१ |
कोमल ड |
A Flat b |
चतुश्रुती ड |
ड२ |
तीव्र |
A |
कैसिकी न |
न१ |
कोमल न |
B Flat Bb |
काकली न |
न२ |
तीव्र न१ |
B |
यज्ञाच्या देवता कडे पहिले असता
असा एक कयास बांधता येतो की, मानवाने अति प्राचीन काळात,
कदाचित भयामुळे, वा वाटणार्या भितीपोटी आपल्या भयाला वाट करून
देण्याकरिता व त्याचबरोबर त्या दृश्य शक्तिना पाहून त्याच्या तोंडून जे स्वर बाहेर
पडले असतील तेच स्तवन, किंवा प्रार्थना यास्वरुपात प्रगट झाले.
मी असे मुळीच म्हणत नाही केवळ भितियुक्त अंत:करणामुळेच ते शब्द नकळत
आपोआप बाहेर पडले; त्यापेक्षा असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल
की मानवाच्या त्याही स्थितीत व परिस्थितीत त्या ऋषींनी जाणीवपूर्वक सचेतपणे ती रचलेली
आर्ष स्तुतिस्तोत्रे आहेत. त्यात भितीपेक्षा आदर, प्रेम, आस्था, आपुलकी, ओढ ही जास्त अनावरपणे
जाणवते.
त्या स्तोत्रातील प्रमुख देवता
व त्याच्याविषयी थोडीसी माहिती पाहणे येथे योग्य ठरेल.
०१) अग्नि: अग्नीचे निवास पृथ्वीवर असून त्याची अनुभूति सहज
शक्य आहे, मात्र त्याचे यथोचित स्थान यज्ञाचे यज्ञकुंड आहे. वैदिक काळापासून पूजनीय
देवतांमध्ये इंद्रा नंतर अग्नीचा क्रम येतो.
०२) इंद्र: इंद्राचे निवासस्थान अंतरीक्ष आहे. वैदिक काळापासून
सर्व देवतांचा प्रमुख इंद्र असे मानले जाते. इंद्रास सोमपान फार प्रिय आहे. इंद्राचे
अमोघ अस्त्र “वज्र”, हे महर्षि दधीची ऋषींच्या हाडांपासून बनलेले आहे. इंद्राच्या प्रमुख कर्तव्यामध्ये
प्रकाश, पर्जन्य व सर्व प्रकारची संपती देणे हे आहे.
०३) सोम: सोमाचा निवास पृथ्वीवर आहे. सोम ही वेली उत्तर
भारतात डोंगरावर आढळते. त्या डोंगराचे नाव “मुजावम” असे आहे. त्या वेलीना वाटून त्याचा
रस काढल्या जातो व त्यापासून निघणार्या रसाला शुद्ध केल्यानंतर जो अर्क राहतो त्याला
“पवमानम” असे म्हणतात.
०४) उषा: उषा स्त्री देवता आहे. उषेचे निवासस्थान अंतरिक्ष
आहे. सूर्योद्यापूर्वी उषा तिच्या आकर्षक लाल र्ंगाने दृगोच्छर होते.
०५) सूर्य: सूर्याचेही निवासस्थान अंतरीक्ष आहे. विश्वाचा
आत्मा सूर्य आहे. सूर्य सर्वांना आरोग्य, गरिमा (तेज) व ताकद / शक्ति (वितसमिन
D) प्रदान करतो.
०६) विष्णु: विष्णुचेही
निवासस्थान अंतरीक्षच आहे. विष्णु सर्वस्थळी उपस्थित असतो असे मानल्या जाते. विष्णुला
संपूर्ण विश्वाचे शक्तिस्थान मानल्या जाते.
आता थोडेसे आधुनिक उपलब्ध ग्रंथविशयी
पाहू. तुलनात्मक दृष्ट्या अलीकडच्या काळातील संगीत शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ व ग्रंथकार
पाहू.
अ) पं. द्त्तिल – द्त्तिलम
आ)
पं मतंग – बहूद्देशी
इ)
पं जयदेव – गीतगोविंद
ई)
पं शार्ङ्ग्देव – संगीत रत्नाकर
उ)
पं लोचन – रागतरंगिणी
ऊ) पं रामामात्य – स्वरमेल
कलानिधी
ऋ) पं पुंडरीक विटठ्ल –
रागच्न्द्रोदय इत्यादि
ऌ) पं सोमनाथ – रागविबोध
ऍ)
पं दामोदर – संगीत दर्पण
ऎ)
पं अहोबल – संगीत पारिजात
ए)
पं भावभट्ट – विलासंकुश रत्नाकर
ऐ)
पं श्रीनिवास – रागतत्व विनोध
ऑ)
पं कृष्णांनंद व्यास – राग कल्पद्रुम
ऒ)
पं अप्पा तुळशी – संगीत शस्त्रदीपिका
ओ)
पं वि ना भातखंडे – हिंदुस्तानी संगीत पद्धती
औ)
पं वि दी पलूस्कर – संगीत बाळबोधादि
वरील सर्वांमध्ये
सारङ्ग्धर ह्यांनी अत्यंत उत्कृष्ट लिखाण शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे.
देवगिरी नृपाश्रित शारंग्धर
पंडित | ग्रंथ रत्ंनाकर श्रेष्ठ द्क्षिंनोतर संमत ||२२||
नाट्ट्य शास्त्र बृहद्देशी
ग्रंथमान्य रत्ंनाकरा|गीत वाद्य नृत्यत्र्यये विशेषत्व रत्ंनाकरा ||२३||
स्वर, राग, प्रकीर्ंनाख्य प्रबंध, ताल,
वादन|
नर्तनात सप्ताध्यायी
संगीत शास्त्रभूशण ||२४|| संगीत भारती
संगीत रत्ंनाकरामध्ये एकूण आठ प्रकरणे आहेत.
ती अशी,
०१) पदार्थसंग्रहप्रकरणम
०२) पिंडोत्प्त्तीप्रकरणम
०३) नाद-स्थान-श्रुति-स्वर-जति-कुल-दैवत-पिच्छन्दो-रसप्रकरणम
०४) जीआरएएन-मूर्छ्ना-क्रम-तान-प्रकरणम
०५) साधारन प्रकरणम
०६) वर्ंनालंकार प्रकरणम
०७) जातिप्रकरणम
०८) गीतिप्रकरणम
याशिवाय, त्या पुस्तकाच्या
शेवटी सात अनुबंध सुद्धा जोडलेले आहेत.
अनुबंध:
०१) श्रुतिवीणास्वरग्रामबोधिनी
०२) शुद्धस्वरविकृतम्बरपट्टीका
०३) मूर्छनानामबोधिनी
०४) मूर्छनाभेदा
०५) ज्यात्त्यष्ठादशकविमर्शनी
०६) स्वरप्रस्तार
०७) श्लोकानामर्धानुक्रमणीका
संगीतरत्ंनाकर हा अत्यंत
सुंदर, विस्तृत व महितीपूर्ण असा संगीतावरील ग्रंथ आहे.
संस्कृत व संगीत प्रेमिनी
एक शोध निबंध अवश्य वाचवा. Therapeutic Aspects and Science Behind Raga Chikitsa by Shambhavi
Das. [Shambavi Das, 2019, Int J Recent Sci Res. 10 (10), pp.35266-35269.DOI: http://dx.doi.org/10.24327/ijrsr.2019.1010.4068]
हा लेख परिपूर्ण करण्यापूर्वी
थोडक्यात, माझे पितृव्य, स्व. राष्ट्रीय संस्कृत पंडित अच्युत
बाळकृष्ण भालेराव यांनी लिहीलेल्या संगीत भारती, या
पुस्तकातील काही श्लोक “संगीतपरंमपरासूत्र” स्वरुपात आहे. ते खाली उधृत करतो.
गीत शोध विधात्याचा, भरता बोध जाहला
|
आदिदेव सभेमध्ये, गीतनाद निनादला
||५||
जगाची वेद ही माता, साम संगीत माऊली
|
गांधर्व वेद ही संज्ञा, संगीता रूढ जाहली
||६||
गानी नारद गंधर्व, श्रीकृष्ण वेणु
वादनी |
नर्तनी आदिदेवाच्या, गीत वाद्य नृत्य
ध्वनि ||७||
वीणामर्मज्ञ सुग्रीव, संगीतज्ञ रावण
|
भेरी मृद्ङ्ग वाद्यांचे, रामायणी निनादन
||८||
श्रीकृष्ण वाजवी वेणु, पार्थ वीणा विशारद
|
गायिका उत्तरा उषा, शोभे संगीत भारत
||९||
चित्रसेन गंधर्व, उर्वशी अप्सरागण
|
संगीतशास्त्र मर्मज्ञ, देवराज सभाजन ||१०||
कालिदास जग्गनाथ, गीत साहित्य
केसरी |
स्वरांचा गंध स्वछ्ंदे, घेती देती महीवरी
||११||
शिक्षात्रय श्रुतिस्मृति, सर्व संगीत मानिती
|
पुराणग्रंथ साहित्य, संगीतशास्त्र
शंसती ||१२||
वैदिकोपनिश्त्काल, पुराण बौद्ध
जैन ही |
गुप्त मुस्लिम आङ्ग्लादि, संगीत सार्वकालही
||१३||
मी काही संस्कृत पंडित नाही किंवा
हा लेख म्हणजे आचार्य पदवी करिता केलेले संशोधनही नाही. हा संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने
अभ्यास करून लिहिलेला फार तर लघु निबंध आहे.
मानस:
प्रबंधगुणसंदोह, शास्त्र गुरुकृपेमुळे
|
प्रबंधदोष सारे ते, माझ्या मंद प्रज्ञेमुळे
||
वाचनी चिंतनी जे जे, तयांचे व्यक्त
चिंतन |
न्यूनातिरिक्त पुरत्यर्थ, तज्ञपादाभिवंदन
||
श्रीगणेश जगदंबा, सद्गुरू चरणार्पण
|
कृति सामवेदसंगीत, सेवा सर्वाभिनंदन
||
संस्कृतभारती सेवार्थ, केले अल्प प्रयत्नही
|
लिहीले अल्पज्ञानाने, इति मुकुंदायन
||
मुकुंद भालेराव
प्रचार प्रमुख: देवगिरी
प्रांत – संस्कृत भारती
संपर्कसूत्र: mukundayan@yahoo.co.in
No comments:
Post a Comment
Welcome. Thanks for your comments